1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (16:02 IST)

बिकिनी घालायची केली जबरदस्ती, मराठी अभिनेत्याला केली अटक

Marathi TV actor Mandar Kulkarni arrested for molesting a 17-year-old girl
मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. फोटोशूटच्या कारणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंदारला पुण्यात पकडले आहे. अभिनेता मंदार कुलकर्णीची भूमिका असलेल्या ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ यासारख्या मालिका गाजल्या आहेत. प्राप्त माहिती नुसार मंदारने बिकनी फोटोशूट करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार नोंदवली आहे. जानेवारी महिन्यात एका नाट्य शिबीरात या मुलीशी त्याची ओळख  झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर मंदारने तिला टीव्ही मालिकेच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करायचं आहे, असं सांगून आपल्या घरी बोलावले होते, ही तरुणी घरी आल्यानंतर मंदारने तिला पाच ड्रेस ट्राय करण्यासाठी दिले. काही कपड्यांवर फोटोशूट झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घाल असे सांगितले होते. बिकिनीत फोटोशूट करण्यास आपण कम्फर्टेबल नाही असे तिने त्याला सांगितले, मात्र मंदारने आपल्याला जबरदस्ती अर्धनग्नावस्थेत फोटोशूट करण्यास भाग पाडलं आणि विनयभंग केला, असा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. तर हे संपूर्ण फोटोशूट झाल्यानंतर याविषयी घरात कोणाला सांगू नकोस अशी धमकीही दिली गेली. या तरुणीने मंदारच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने मंदार कुलकर्णी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर कलम 345 अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला गजाआड केलं.