मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (18:26 IST)

अभिषेक बच्चनने खाल्ली मिसळ

Abhishek Bachchan
Instagram
Misal Eaten by Abhishek Bachchan नुकताच अभिषेक बच्चनचा बॉक्स ऑफिसवर 'घूमर' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यावर पुनः रागमन करीत आहे. अखेर ओटीटीनंतर अभिषेकचा आता थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे.. 18 ऑगस्ट रोजी अभिषेकचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिषेक बच्चनसोबत चित्रपटात प्रमुख भूमिकेत सैयामी खेर देखील दिसणार आहे. 
 
सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतेच त्यांनी 'चला हवा येऊ द्या' मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. अभिषेकने प्रमोशन दरम्यान अनेक कार्यक्रमांना आणि टिव्ही शोला भेटी दिल्या आहेत. अभिषेक या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय टिव्ही शो 'चला हवा येऊ द्या'मध्ये त्याने हजेरी लावली आहे. या शो आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आल्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 
 

अभिषेकने प्रमोशनमध्ये स्पेशल झणझणीत मिसळवर ताव मारला होता. सध्या अभिषेकच्या एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिषेकने प्रमोशन दरम्यान, त्याला मामलेदारची मिसळ फार आवडते, असे सांगितले होते. त्याला मिसळ खूपच आवडत असून तो नेहमीच मिसळ खातो. सोबतच यावेळी अभिषेकने मिसळवर ताव मारल्यानंतर सैराटच्या झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही करताना दिसला.