Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: मंगळवार, 18 जून 2019 (12:21 IST)
 
“मोगरा फुलला' या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले आहे. मुंबई,पुणे,ठाणे येथील शहरांमधील प्रेक्षक ही घराघरातील कौटूंबिक गोष्ट अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने १४ जून पहिल्या दिवशी शुक्रवारी ३७.५ लाख इतकी कमाई केली त्यानंतर दुसऱ्या शनिवार १५ जुन रोजी ५६.२ लाख तर १६ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगात सामना असूनदेखील प्रेक्षकवर्ग ‘मोगरा फुलला’ पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहचला होता आणि तिसऱ्या दिवशी ५१.५ लाख इतकी कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण पहिल्या तीन दिवसात १ करोड ४५ लाख इतकी कमाई केली आहे . त्याचबरोबर प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद बघून मोगरा फुलला सिनेमाच्या शोज मध्ये वाढ करण्यात आली आहे .
 
‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी,चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे. नीना कुळकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळते, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची “पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं,नात्यांनी समृद्ध होणं कठीण” या टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.
 
चित्रपटातील गाणी अभिषेक कणखर यांनी लिहिली असून रोहित राऊतने संगीत दिले आहे. शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी यांच्या आवाजातील गाणी उत्तम जुळून आली आहेत.
 
उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

यश राज फिल्म्स पहिल्यांदाच एक हॉरर चित्रपट बनवणार असून, त्यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार

प्रत्येक साडी अद्वितीय असते; विद्या बालनने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकरांना सलाम केला

'आवारापन 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला; इम्रान हाश्मी एका दमदार अवतारात चमकला

उत्तराखंड मधील जागेश्वर धाम; देवदाराच्या जंगलात वसलेली २२४ प्राचीन शिव मंदिरे

'बीइंग ह्युमन' घोटाळा प्रकरणात सलमान खान आणि अलविरा खान यांना कोर्टाने समन्स बजवले

पुढील लेख
Show comments