गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:57 IST)

Rajinama- 'राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

raji nama
भिजित पानसे- अक्षय बर्दापूरकर पुन्हा एकत्र 
सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत 'राजी-नामा'चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून वेबविश्व हादरून सोडणाऱ्या 'रानबाजार'नंतर अभिजित पानसे आणि 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ही जोडी पुन्हा एकदा 'राजीनामा'च्या निमित्ताने एकत्र येणार आहे. प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारित 'राजी-नामा'ची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून आता लवकरच प्रेक्षकांना पुन्हा एकदा सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.
 
अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या 'रानबाजार'ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. यशोशिखरावर पोहोचलेल्या 'रानबाजार'मधील सत्तानाट्यानंतर आता 'राजी-नामा'मध्येही 'खुर्ची'साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’ मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.