गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (15:22 IST)

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली लग्नबंधनात अडकले

फोटो साभार -सोशल मीडिया 
सारेगमप लिटिल चॅम्प्स मधून प्रसिद्ध झालेल्या गायक रोहित राऊत आणि  गायिका जुईली जोगळेकर आज विवाह बंधनात अडकले .पुण्यातील ढेपेवाडा येथे हा लग्नसोहळा पार पडला .

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रोहित आणि जुईली हे दोघे 8 वर्षांपासून नात्यात होते. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली व्हेलेंटाईन डे च्या दिवशी एकमेकांसह असलेला फोटो शेअर करत दिली होती. 'सूर नवा ध्यास नवा' या शो मध्ये जुईलीने स्पर्धक म्हणून भाग घेतले होते. आणि या शो दरम्यान रोहित आणि जुईलीची ओळख झाली. नंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली होती. आज ते एकमेकांसह विवाहाच्या बंधनात अडकले. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या विधी ग्रहमख, साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत सोहळा, सुरु होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज लग्नसोहळ्याचे फोटो देखील  सोशल मीडियावर व्हायरल  झाले आहे. नवदाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.