बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (07:14 IST)

‘माझा होशील ना’ कडून प्रेक्षकांसाठी सरप्राइज

आलेली ‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. मालिकेतील सई, आदित्य आणि नैना ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेत. पण गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी आणि मुग्धा पुराणिक या कलाकारांची चाहत्यांना आठवण येतेय. म्हणूनच मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहे.
 
मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये सई, आदित्य आणि नैना एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताहेत. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सई कॉफी करताना दिसतेय. हे सरप्राइज प्रेक्षकांनाही आवडलं आहे.