1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (16:37 IST)

राजश्रीच्या 'यु टर्न'मध्ये हटके खटके

U turn
असं म्हणतात,की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. इथे फक्त त्या निभावाव्या लागतात. हे नातं जपताना कधी त्यात भरभरून प्रेम असतं, तर कधी रुसवेफुगवे, कधी जवळीक असते, तर कधी दुरावाही. प्रेमातील असे चढउतार घेऊन राजश्री मराठीची 'यु टर्न' ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच 'यु टर्न'चा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजची निर्मिती नेहा बडजात्या यांनी केली असून दिग्दर्शन मयुरेश जोशी यांचे आहे.
 
ट्रेलरवरून ही वेबसिरीज लग्नानंतरच्या आंबट-गोड क्षणांवर आधारित आहे, याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावं, याचे सल्ले देणारे आदित्य आणि मुक्ता लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालताना यात दिसत आहेत आणि हेच वाद अखेर टोकाला जातात. एका नाजूक वळणावर आल्यानंतर आदित्य आणि मुक्ता काय निर्णय घेतात? 'यु टर्न' घेणार, की त्यांचे मार्ग वेगळे होणार? याची उत्तरं मात्र ही वेबसिरीज पाहिल्यावरच आपल्याला मिळतील. 
  'यु टर्न'च्या निमित्तानं राजश्री मराठीनं वेब विश्वात पाऊल टाकलं आहे. या वेबसिरीजच्या लेखनाची, संगीताची आणि गीतांची धुराही मयुरेश जोशी यांनीच  सांभाळली आहे. ही वेबसिरीज २३ जुलैपासून दर मंगळवारी दुपारी दीड वाजता राजश्री मराठीच्या युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.