शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (09:26 IST)

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या स्पर्धकांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला. त्याला भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सुवर्ण कटयार देण्यात आली.
 
‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या पर्वात फक्त महाराष्ट्रातून नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं.