मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मे 2020 (13:10 IST)

श्रेयस तळपदेच्या डोळ्याला नक्की झाले तरी काय?

अभिनेता श्रेयस तळपदे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. परंतु जेव्हा कधी तो सोशल मीडियावर येतो त्यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावेळी त्याने एक आश्चर्यचकित करणारा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून श्रेयसला झाले तरी काय? असा प्रश्न नक्कीच तुमच्या डोकावेल.
 
इन्स्टामग्रावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या एका डोळ्याला पट्टी लावलेली दिसत आहे. पायरेट्‌स ऑफ क्वारंटाइन, मी चुकीच्या जागेवर मास्क लावलेला नाही. तुम्ही हा फोटो पाहून सांगू शकता ही पट्टी मी का लावली आहे. धन्यवाद डॉक्टर सोनल जाधव.
 
अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे. ही कॉमेंट वाचून श्रेयसला काही दुखापत तर झाली नाही ना? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही तासांत शेकडो नेटकर्यां नी या फोटोवर आपल्या ‍प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
श्रेयस तळपदे मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ‘दामिनी’ या मालिकेतून श्रेयस प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने ‘रेशमगाठ', ‘झुळूक', ‘पोश्चर बॉईज', ‘पछाडलेला' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. याशिवाय ‘गोलमाल',  ‘ओम शांती ओम', ‘इक्बाल', ‘अपना सपना मनी मनी' यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.