सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

एक कोटी डॉलरचा वॉर्नचा बंगला

एक कोटी डॉलरला विकला जाणार वार्नचा बंगला

आपल्या बायको बरोबर नवीन जीवन सुरू करायला जाणार्‍या ऑस्ट्रेलियाचा महान ‍फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आपला विक्टोरिया येथील भव्य बंगला एक कोटी डॉलरला विकणार आहे.

वार्न सध्या आपली बायको सिमोन कालाहन व तीन मुलांसह सध्या ब्रिटन मध्ये रहात आहे. त्यांना आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे.

2970 मीटर च्या या बंगल्यात सहा बेडरूम चार बाथरूम दोन स्टडी रूम एक बार व फ्लड लाईट असलेले टेनिसचे कोर्ट आहे.

वार्न चे प्रॉपर्टी एजंट जोनाथन डिक्सन ने सांगितले की खुप लोकांनी हा बंगला खरेदी करण्यात उत्सुकता दाखवल आहे. आम्ही याबाबत सविस्तर चौकशी केल्यावरच योग्य लोकांना बंगला दाखवणार आहोत.