Last Modified: कराची , बुधवार, 19 नोव्हेंबर 2008 (00:57 IST)
चौकशी अहवाल सार्वजनिक केल्याबद्दल आसिफ नाराज
मादक द्रव्य बागळल्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा अहवाल लवकरच समिती पीसीबीला सादर करणार असल्याचे नगमी यांनी सांगितले. प्रतिबंधीत मादक द्रव्य बाळगल्याप्रकरणी आम्ही त्याला दंड आणि त्याच्यावर प्रतिबंध लावण्याची शिफारस या अहवालात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशी अहवाल पीसीबीला सादर करण्यापूर्वीच सार्वजनिक केल्याबद्दल आसिफने आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणाची मागील जुलै महिन्यापासून चौकशी सुरू असून आम्हाला आतापर्यंत अहवाल किंवा समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.