सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

बकनर यांचा पंचगिरीचा नवा विक्रम

जमैकाचे स्टीव बकनर चार विश्वचषकातील अंतिम सामन्यात अंपायरिंगचा आपलाच विक्रम शनिवारी येथे तोडणार आहेत.

आंतरराष्ट्रीय‍ क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने बकनर यांना ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या विरूध्द होणार्‍या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी चार वेळा त्यांनी ही कामगिरी केली आहे.

बकनयांच्यसाथीला पाकिस्तानचे अलीम डार यांचीही पंच म्हणून निवड घाली आहे. ते प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करणार आहेत.

60 वर्षाचे बकन यांना किकेट विश्वात आदराचे स्थान आहे. त्यांनी याआधी 1992 1996 1999 तसेच 2003 च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पंच म्हणन काम पाहिले होते.