बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

वायुसेनेचा ग्रुप कॅप्टन सचिन!

ND
भारताचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील त्याच्या गरूडझेपेबद्दल भारतीय वायुसेनेने आज मानद' ग्रुप कॅप्टन' ही पदवी बहाल करून त्याचा सन्मान केला. आयएएफच्या वतीने सन्मानित करण्यात आलेला सचिन पहिलाच खेळाडू ठरला. उड्डयन क्षेत्रात कुठलाही अनुभव पाठीशी नसलेला तो पहिला व्यक्ती आहे.

यापूर्वी २००८ साली भारतासाठी क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिकणाऱ्या क्रिकेट संघाचा कर्णधार कपिलदेव याचा प्रादेशिक सेनेच्या वतीने 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद पदवी देऊन सन्मान करण्यात आला होता. विक्रमांचा पर्याय ठरलेला ३७ वर्षांचा सचिन हा वायुसेनेचा 'ब्रॅन्ड अॅम्बेसेडर'ही आहे. वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल पी.व्ही. नायक यांनी वायुसेना सभागृहात झालेल्या एका देखण्या सोहळ्यात सचिनला 'ग्रुप कॅप्टन' ही पदवी बहाल केली.