मंगळवार, 11 मार्च 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: अबुधाबी , सोमवार, 21 एप्रिल 2014 (13:35 IST)

विजयासाठी चेन्नई संघ उत्सुक

सातव्या आयपीएल स्पर्धेत पहिल्याच सामन्यात धक्काकादाक पराभव पत्करणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन सामन्यात एक विजय मिळविणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघात आपीएल टी-20 स्पर्धेचा साखळी सामना आज (सोमवारी) खेळला जात आहे.

या स्पर्धेत चेन्नईचा संघ विजाच रुळावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. 205 धावा करूनही चेन्नईचा संघ मोहालीकडून पराभूत झाला. दोन वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मोहालीविरुद्धचा सामना गोलंदाजांनी गमावला अशी टीका केली आहे. याउलट दिल्ली संघाने कोलकाता नाइट राडर्स संघाला 6 बाद 167 धावा करून पराभवाची खडे चारले आहे. दिल्ली संघाने पहिल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आठ गडी आणि 20 चेंडू राखून पराभव पत्करला होता. दुसर्‍या सामन्यात मात्र त्यांनी कामगिरीत सुधारणा घडवून आणला आहे. प्रभारी कर्णधार दिनेश कार्तिक आणि जे. पी. डुमिनी या दोघांनी दिल्लीला लागोपाठ सात पराभवानंतर पहिला विज मिळवून दिला. चेन्नईचा ऑफस्पिनर रविचंद्र अश्विन हा प्रभाव पाडू शकला नाही. आशिष नेहरा व मोहित शर्माच वेगाला डेव्हिड मिलरने दाद दिली नाही. त्यामुळे चेन्नईला हा सामना खेळताना गोलंदाजीची रचना करताना पुन्हा विचार करावा लागेल.

दिल्ली संघातून सेहवागसारखे खेळाडू बाहेर आहे. तरीही या संघाने त्यांच्या कामगिरीत सुधारणा घडविली आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील सामना अटीतटीचा ठरणची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

दिल्ली डेअरडेव्हिल्स : केविन पीटरसन (कर्णधार), मयंक अगरवाल, नथन कोल्टेर निले, क्विन्टॉक डी-कॉक, जीन पॉल डुमिनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सिद्धार्थ कौल, मिलिंद कुमार, मोहम्मद शमी, शहाबाज नदीम, जिमी निशाम, वेन पारनेल, एच. एस. शरथ, राहुल शर्मा, लक्ष्मी  शुक्ला, राहुल शुक्ला, रॉस टेलर, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जदेव उनाडकट.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), सुरेश रैना, बाबा अपराजित, रविचंद्रन अश्विन, ड्वेन ब्राव्हो, प्लेसिस, ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅकुलुम, आशिष नेहरा, मोहित शर्मा, ईश्वरचंद्र पांडे, बेन हिलफेनहस, जॉन हेस्टिंग्ज, सॅमुअल बद्री, मॅट हेन्री, मिथुन मनहस, विजय शंकर, रोनीत मोरे, पवन नेगी.

सामन्याची वेळ रात्री 8 वाजता.