बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

सचिन व गांगुलीला वनडेतून हकालपट्टी : कपिल

भारताचा माजी कर्णधार कपिल देव म्हणाला की सचिन तेंडूलकर व सौरभ गांगुली या दोघांचीही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मधून हाकालपट्टी करण्यात आली आहे. यांना विश्रांती देण्याच्या नावाखाली ही गोष्ट लपवण्यात येत आहे.

झोनल क्रिकेट अॅकॅडमीचच्या शिबिरासाठी तो येथे आला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला की वेगवेगळ्या क्रिकेटपटूंसाठी वेगवेगळे नियम असू शकत नाही. सगळे समान आहेत. कोणात्याही क्रिकेटपटू बरोबर वेगळ्या प्रकारची वागणूक कशी केली जाईल.

मे मध्ये होणार्‍या बांग्लादेश दौर्‍यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय सामन्यात या दोघांना विश्रांती देण्यात आली त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते म्हणाले यावर अर्धाच उपाय होऊ शकत नाही. एक तर त्यांना संघात ‍तरी घेतले पाहिजे नाहीतर बाहेर तरी ठेवले पाहिजे.

तो पुढे म्हणाला की गेल्या सहा महिन्यात त्यांनी एवढेही क्रिकेट खेळलेले नाही की त्यांना आता विश्रांती दिली पाहिजे. विश्वचषकात खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास खचला आहे. तो पुन्हा प्राप्त करण्यासाठी संघाला एखाद्या चांगल्या मालिकेची गरज आहे.