गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (11:24 IST)

इंग्लंड विरुद्ध शतक लावून बाबर आझमने जोरदार पुनरागमन केले, विश्वविक्रम केला

इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबरआझमने खास विक्रम नोंदविला आहे. या सामन्यात बाबरने आपल्या कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावत सर्वात कमी डावात 14 शतके लावण्याचा विश्वविक्रम केला.या प्रकरणात त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलाला मागे टाकले.ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सर्वात कमी डावात 14 एकदिवसीय शतके पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या  स्थानावर आहे.
 
या यादीमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली 103 डावांमध्ये 14 एकदिवसीय शतके पूर्ण करून चौथ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर बाबरने फॉर्ममध्ये पुनरागमन केले आणि शतक ठोकले.या शानदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणार्‍या खेळाडूंच्या यादीत बाबर तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. त्याच्यापेक्षा मोहम्मद युसूफ आणि सईद अन्वर यांनी अधिक शतके केली आहेत.
 
 
बाबरने पाकिस्तानच्या डावातील 38 व्या षटकात साकीब महमूदच्या चेंडूवर चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.या सामन्यात बाबरखेरीज इमाम व रिझवानच्या फलंदाजीसह अर्धशतकं निघाले.याच्या मदतीने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला प्रथमच 300 धावांचा आकडा पार करता आला. पाकिस्तान संघाने 50 षटकांत बोर्डवर एकूण 331धावा फटकावत इंग्लंडला विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य दिले.