1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (00:04 IST)

बाबर आझमने विजयासह धोनी-रोहित शर्माला मागे टाकत विश्वविक्रम केला

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन केले आहे. पाकिस्तान संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा पराभव करून इतिहास रचला आहे.
 
 महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा याना मागे टाकत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदवला.

आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना सात गडी राखून जिंकण्यात पाकिस्तानला यश आले. पाकिस्तानने दुसरा T20 सामना जिंकल्याने, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची मालिका प्रत्येकी एकाने बरोबरीत आहे. पाकिस्तानने आयर्लंडचा सात धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत बरोबरी साधली आहे.
 
हा सामना जिंकून बाबर आझमने विश्वविक्रम केला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकणारा तो कर्णधार बनला आहे.त्याने 78 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले, 45 सामने जिंकले.
 
Edited by - Priya Dixit