बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (18:18 IST)

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने सोडली रेल्वेची नौकरी राजीनामा दिला

कुस्तीपटू विनेश फोगटने शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पूर्वी तिने रेल्वेच्या नौकरीच्या राजीनामा दिला. तिने स्वतः ही माहिती दिली.ती म्हणाली, रेल्वेची सेवा करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. रेल्वे कुटुंबाची मी नेहमीच ऋणी राहीन. 

मी आता नवी सुरुवात करत असून आयुष्याच्या नवीन वळणावर जाण्यापूर्वी मी रेल्वेपासून वेगळे होण्याचा विचार केला आहे. मी माझा राजीनामा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या संधी बद्दल मी नेहमीच रेल्वे विभागाची ऋणी राहीन. 
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी कांग्रेसपक्षात प्रवेश केला आहे. या साठी त्यांनी दोघांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले आहे. 
Edited by - Priya Dixit