शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (16:44 IST)

डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आणि तामिळनाडू प्रीमियर लीग म्हणजे टीएनपीएलनंतर यावर्षी डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार आहे. पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली.

या लीगसाठी आयएमजी-आरशी करार करण्यात आला असून मालिकेत एकूण सहा संघ असतील. मालिकेसाठी ईडन गार्डन्ससह तीन मैदानं निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली. पश्चिम बंगाल क्रिकेटच्या विकासासाठी ही लीग महत्वपूर्ण ठरेल. लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पडेल, असंही गांगुली यांनी सांगितलं.