सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गेल पिंपरीच्या शाळेत

वेस्ट ‍इंडिज आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल चक्क पिंपरीत गेला होता. पिंपरी- चिंचवडच्या एसएनबीपी शाळेतल्या मैदानाचे उद्घाटन क्रिस गेलच्या हस्ते झाले. यावेळी क्रिस गेलचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत झाले. विद्यार्थ्यांनाही गेलसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
 
आपण लहानपणी क्रिकेट खेळताना अनेक इमारतींच्या काचा फोडल्या आणि शिक्षकांचाही मार खाल्ल्याची कबूली क्रिस गेलने यावेळी दिली. तसेच लहानपणी बॅट हाती घेतल्यापासूनच चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याची सवय असल्याचेही गेलंने सांगितले.