शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (09:21 IST)

'काला चष्मा' गाण्यावर धोनी आणि पांड्याचा हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, पण तरीही त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतात. नुकताच धोनी आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक आणि रॅपर बादशाह 'काला चष्मा जचदा' हे गाणे गाताना दिसत आहे तर महेंद्र सिंह धोनी आणि हार्दिक पंड्या डान्स करताना दिसत आहेत.
ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धोनी आणि पांड्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.  न्यूझीलंड दौऱ्यावरून परतलेला हार्दिक पांड्या पहिल्यांदा महेंद्रसिंग धोनीला भेटायला गेला होता. यानंतर दोघांमध्ये खूप धमाल झाली, तरीही पांड्या धोनीच्या खूप जवळचा मानला जातो आणि दोघेही अनेकदा मस्ती करताना दिसतात. न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिककडे T20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20 मालिकेत न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केला.
 
Edited By- Priya Dixit