मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (16:09 IST)

हार्दिक पंड्याचे घड्याळ 32 हिऱ्यांनी जडलेले आहे, किंमत जाणून चकित व्हाल

भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आवडता हार्दिक पंड्या नेहमीच त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो. तो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण तो सतत त्याचे टॅटू आणि केशरचना बदलत असतो. एवढेच नाही तर त्याची ड्रेसिंग सेन्स तरुण पिढीला खूप आकर्षित करते.
 
हार्दिक पंड्या आपल्या खेळाच्या जोरावर तर हेडलाईन्समध्ये राहतो पण महागड्या छंद आणि मजासाठी सतत चर्चेत राहतो. अलिकडेच त्याच्या घड्याळाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्याच्या या घड्याळाची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.
 
त्याने या घड्याळाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हे घड्याळ पेटेक फिलिप नॉटिलस प्लेटिनम -5711 ब्रँडची असल्याचं सांगितले जात आहे.
 
घड्याळात 32 हिरे जडलेले आहेत
हार्दिक पंड्याचे घड्याळ 32 बगौटे कट डायमंड्स जडलेले आहे. त्यावर सोन्याचा मुलामाही लावण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच जी गोष्ट सोन्याची आणि हिऱ्यांची बनलेली असते, मग ती वस्तू महाग असावी लागते.
 
दुसरीकडे, कृणाल पंड्याने अलीकडेच मुंबईत 30 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे, जो सुमारे 4 हजार चौरस फूटांवर पसरलेला आहे. यात 8 बेडरुम, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि छतावरील पार्किंग आहे.
 
शानदार कारनेही चाहत्यांची मने जिंकली
दोन्ही पंड्या बंधू आयपीएल खेळण्यासाठी दुबईला पोहोचले आहेत आणि त्यांच्या टीम मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्येही सामील झाले आहेत. दुसऱ्या भागाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सनेही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन्ही भावांच्या जोडणीची पुष्टी केली आहे.
 
हार्दिकने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहे
एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यातून दोन्ही भाऊ लक्झरी कारमध्ये टीम हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. या व्हिडिओमध्ये हार्दिक हेटमध्ये रॉकस्टारसारखा दिसत आहे.
 
घड्याळ असो, घर असो किंवा कार, दोन्ही भावांनी आपली आलिशान जीवनशैली दाखवण्याची संधी सोडली नाही.