शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (20:20 IST)

हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत किती?

आपल्या आक्रमक आणि जलद खेळी प्रमाणे क्रिकेटची कारकिर्दही ‘फास्ट’ पुढे नेणारा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा त्याच्या हटके लाईफस्टाईलसाठी चर्चेत आला आहे. हार्दिक यावेळी त्याच्या घड्याळामुळे चर्चेत आला असून नुकतेच त्याने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. ज्यात त्याने त्याच्या घड्याळाचा एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोतील घड्याळाची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच फिरतील.
 
हार्दिक पंड्याने घातलेले घड्याळ हे Patek Philippe Nautilus Platinum 5711 या ब्रँडचे असून याची किंमत ही 5 कोटींपेक्षाही अधिक आहे. पंड्याने घातलेले हे घड्याळ नेटकऱ्यांनी पाहताच त्याची किंमत सर्च केली ज्यानंतर भल्यभल्यांचे डोळे फिरले आहेत. तर पंड्याच हे घड्याळ नेमकं आहे तरी कसं पाहा त्यानेच पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये…