बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (15:26 IST)

IND vs ENG:रविचंद्रन अश्विन इंग्लंड कसोटीपूर्वी सरेकडून काऊन्टी क्रिकेट खेळू शकतो

भारतीय स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिके पूर्वी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरेकडून प्रथम श्रेणी सामना खेळणार.अश्विन आधीपासूनच इंग्लंडमध्ये आहे, पण त्याला काउन्टी क्रिकेट खेळण्यासाठी व्हिसा मिळवण्याची गरज आहे.अश्विन आणि काउंटी क्रिकेट क्लब सरे यांना आशा आहे की 11 जुलै रोजी सामना सुरू होण्यापूर्वी ते व्हिसा संबंधित समस्या सोडवतील. साउथॅंप्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी विश्वचषक (डब्ल्यूटीसी)स्पर्धेचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या इंग्लंड मध्ये 20 दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत.  
 
 
'ईएसपीएन क्रिकइन्फो' च्या मते,11जुलैपासून सरेला काउंटी चॅम्पियनशिपमध्ये समरसेटविरूद्ध खेळायचे आहे आणि अश्विन एका सामन्यासाठी या संघाचा सदस्य होऊ शकतो. अश्विनने यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्सेस्टरशायरकडून खेळले आहे. 
 
ब्रेकनंतर टीम इंडियाला 4ऑगस्टपासून इंग्लंडबरोबर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, या साठी खेळाडू 14 जुलैपासून लंडनमधील बायो बबल येथे दाखल होतील आणि त्यानंतर कसोटी मालिकेची तयारी सुरू करतील.कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सिलेक्ट काउंटी इलेव्हन विरुद्ध तीन-दिवसीय सराव सामनाही खेळायचा आहे.अश्विन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.त्याने 14 कसोटी सामन्यांमध्ये 71 बळी घेतले होते.