1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (19:09 IST)

IND vs PAK: शोएब मलिकला पाहून चाहत्यांनी 'जिजा जी'च्या घोषणा दिल्या, सानिया मिर्झाची प्रतिक्रिया

ind-vs-pak
IND vs PAK: पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाने भारतीय चाहत्यांना नक्कीच निराश केले, पण सामन्यानंतर भारताचे खेळाडू आणि पाकिस्तानचे खेळाडू यांनी एकमेकांशी बोलून संपूर्ण क्रिकेट विश्वाची मने जिंकली. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू माहीला भेटत आणि क्रिकेटबद्दल बोलत असल्याचे दिसून आले. आयसीसीने सोशल मीडियावर त्याला स्पिरिट ऑफ द गेम असे नाव दिले आहे. याशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय चाहते सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. 
https://twitter.com/i/status/1452504072167231489
व्हिडिओमध्ये मलिक सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत आहे, अशा स्थितीत भारतीय चाहते मलिकला 'जिजाजी, भाऊजी' म्हणत मजा करताना दिसत आहेत. चाहत्यांच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मलिकही हसतात.
 
दुसरीकडे, सानिया मिर्झानेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली असून, हार्ट इमोजीसह हसणारा इमोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.