मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (13:00 IST)

IND vs SL:कृणाल पांड्यानंतर युजवेन्द्र चहल आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह

IND vs SL: After Krinal Pandya
क्रुणाल पांड्या कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर आता फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि युवा खेळाडू कृष्णाप्पा गौतम यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.कृणाल पंड्या आणि सहा खेळाडूंसह हे दोन्ही खेळाडू सध्या श्रीलंकेत राहतील. कृणाल दुसऱ्या टी -20 सामन्यापूर्वी या व्हायरलच्या कचाट्यात आला होता, त्यानंतर सामना पुढे ढकलावा लागला. श्रीलंकेने तिसऱ्या टी -20 मध्ये भारताचा 7 गडी राखून पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. 
 
त्याचबरोबर उर्वरित टीम संध्याकाळी उशिरा भारतासाठी रवाना होतील. त्यात कृणालच्या जवळच्या संपर्कातील 6 खेळाडूंचाही समावेश आहे.हार्दिक पांड्या पृथ्वी शॉ,सूर्यकुमार यादव,मनीष पांडे, दीपक चाहर आणि ईशान किशन हे खेळाडू आहेत.आरटी-पीसीआर चाचणीत या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे.