करुण नायरच्या ट्रिपल शतकावर सेहवागचा वार
वीरेंद्र सेहवागग भारताचे एकमेव असे फलंदाज होते, ज्याच्या नावावर दोन वेळा ट्रिपल शतकाची नोंद होती. सेहवाग एकाच टेस्टमध्ये ट्रिपल शकत लावणारे पहिले फलंदाज होते. इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये जसंच करुण नायरने आपले ट्रिपल शतक पूर्ण केले, सेहवागने विशेष अंदाजात ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या.
सेहवागने लिहिले 300 क्लबमध्ये तुझे स्वागत आहे करुण. मागील 12 वर्ष 8 महिन्यांपासून मी या क्लबमध्ये एकटा होतो. तुला खूप शुभेच्छा. मजा आला.
सेहवागने मुल्तान येथे पाकिस्तानविरुद्ध आणि चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्रिपल शतक लावले होते.