बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मितालीची क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप

नवी दिल्ली- भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या फलंदाजांच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. दीप्ती शर्माने कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 38 व्या तर थिरूष कामनिीने 41 वें स्थान पटकावले आहे.
 
बांग्लादेशाची कर्णधार रूमाना अहमदने चार स्थानांनी सुधारणा करत 31 वें स्थान गाठले आहे. पाकिस्तानची नैन अबिदीने 26 वे स्थान मिळवले आहे. गोलदाजांच्या क्रमवारीत साना मिरने दोन स्थानांनी सुधारणा करत सातवे स्थान पटकावले आहे. भारताच्या एकता विश्वतने तीन स्थानांनी सुधारणा करत 11 वे स्थान पटाकवले आहे.