शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मिताली राजचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कॅप्टन मिताली राजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिताली चक्क साडी नेसून मैदानात उतरलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 
 
हा व्हिडिओ मितालीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की,'साडी बरंच काही बोलते आपल्यापेक्षा ही अधिक. साडी तुम्हाला कधीच फिट होण्यास सांगत नाही. साडी तुम्हाला वेगळं दिसायला भाग पाडते. या आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2020 वर हा नवा लूक शेअर केला आहे.' या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.