रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (11:58 IST)

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असते. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तसे काही नाही. त्यामुळे तसे न करता तीन-चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिला आहे.