बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (20:11 IST)

प्रसिद्ध खेळाडूवर कारवाई केली जाणार

अम्पायरने अपील फेटाळून लावल्याने रागाच्या भरात येऊन  विकेटवर लाथ मारून अम्पायरच्या अंगावर धावून गेल्यामुळे ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेत झालेल्या कालच्या सामनात हा प्रकार घडला. त्यामुळे बांगलादेशातील क्रिकेट बोर्डाने स्टार खेळाडू शाकिब अली हसन याचा वर ढाका प्रीमिअर लीगचे चार सामने खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे.या पुढे त्याला चार सामने खेळता येणार नाही.
 
या संदर्भात बांगलादेश बोर्डाकडून कोणतेही अधिपत्रक जारी केले गेले नाही.परंतु मोहम्मदन सपोर्टिंग क्लब क्रिकेट समितीचे अध्यक्ष मुसुद्दुज्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 
प्रकरण असे आहे  की शाकिब प्रतिस्पर्धी अबाहानी लिमिटेड विरुद्ध  खेळत असताना त्यांनी दोन वेळा अम्पायरशी वाद घातला आणि त्याचे म्हणणे अम्पायरने फेटाळून लावले असताना त्याला राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन विकेट वर लाथ मारली आणि अम्पायरच्या अंगावर धावून गेला.
 
 या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्याच्यावर कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडे आणि आयसीसीकडे केली आहे.त्याने आपल्या कृत्याची जग जाहीर माफी मागितली आहे.