शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (15:38 IST)

हाताच्या दुखापतीमुळे कुस्तीपटू पुनियाची पोलंड ओपनमधून माघार

ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफायर केलेला भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने डाव्या हाताची दुखापत वाढू नये म्हणून मंगळवारी पोलंड ओपनमधून माघार घेतली आहे.
 
टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी होणार्याम या स्पर्धेत पुनिया 86 किलोग्रॅम वजनी गटातून आपले आव्हान द्यायचे  होते. मात्र, त्याने अमेरिकेच्या जाहिद वेलेंसियाविरूध्दच्या क्वॉटर फायनल लढतीतून माघार घेतली. असे समजते की, 2019 च्या विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्याला वारसॉसाठी रवाना होण्यापूर्वी दोन किंवा तीन दिवस अगोदर सरावादरम्यान ही दुखापत झाली होती.
 
भारतीय संघाच्या एका सूत्राने सांगितले की, पुनियाची इच्छा ही दुखापत वाढू नये अशी होती. त्यामुळे सकाळी त्याने दुखापतीची माहिती देऊन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
डब्ल्यूएफआयचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले की, हो आम्ही त्याला पर्याय दिला होता. आम्ही कुस्तीपटूंवर दबाव आणू इच्छित नाही. ऑलिम्पिक स्पर्धा जवळच आहेत. त्यामुळे धोका  पत्करणत कोणताही अर्थ नव्हता.
 
पुनिया ट्रेनिंग शिबिरासाठी पाच जुलैपर्यंत संघासोबत राहणार आहे. शिबिराचे आयोजन पोलंडच्या महासंघाने केले आहे. पुनियाने स्पर्धेतून माघार घेतल्याने आता केवळ तीन भारतीय पैलवान उरले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 57 किलो वजनी गटातून क्वॉलिफायर करणारा रवी दाहिया पोलंड ओपनमध्ये 61 किलो वजनी गटातून आपले आव्हान उभे करणार आहे. तर विनेश फोगाट (53 किलो ग्रॅम) आणि अंशु मलिक (57 किलो ग्रॅम) शुक्रवारी महिलांच्या गटातून आपली लढत खेळतील.