रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (11:38 IST)

IPL 2019: संजय मांजरेकर म्हणाला - ऋषभ पंत हा आजचा वीरेंद्र सेहवाग आहे

माजी क्रिकेटर आणि समालोचन संजय मांजरेकर म्हणाला की ऋषभ पंत हा आजचा वीरेंद्र सेहवाग आहे. मांजरेकरच्या मते पंत बरोबर वेगळा व्यवहार केला पाहिजे आणि त्याला स्वाभाविकरीत्या खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मांजरेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, 'ऋषभ पंत हा आजचा वीरेंद्र सेहवाग आहे. या फलंदाजाबरोबर वेगळा व्यवहार झाला पाहिजे म्हणजेच तो जसा आहे त्याला तसाच राहू द्या. आपण त्याला संघात घ्या किंवा नाही, पण त्याला बदलण्याचा प्रयत्न नका करू.' 
 
ऋषभ पंताने बुधवारी सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध एलिमिनेटर -1 सामन्यात दिल्लीसाठी 21 चेंडूत 49 धावांची शानदार पारी खेळून दिल्लीला विजय मिळवून दिले. त्याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. महेंद्रसिंग धोनीचा वारस मानला जाणार्‍या ऋषभ पंताने आयपीएलच्या या सीझनमध्ये आतापर्यंत ऐकून 15 सामन्यांत 450 धावा केल्या आहे. परंतु पंताला वर्ल्ड कपात भारतीय संघात स्थान मिळाला नाही आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे  पंताच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवडले आहे.