शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (18:25 IST)

विराट कोहली इंटरनेटवरील सर्वात जास्त वाचला जाणारा क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेट कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली एका सर्वेक्षणानुसार इंटरनेटवरील सर्वात व्यापक वाचला जाणारा क्रिकेटपटू आहे. हे सर्वेक्षण मार्च 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतच्या तथ्यांवर आधारित आहे. या सर्वेक्षणात वाचकांद्वारे सांगितलेले अधिकाधिक वेळेचे विजेता म्हणून युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत विजयी झाले आहे. 
 
सर्वेक्षणानुसार 10 कोटींपेक्षा ही अधिक वाचकांने भारतीय कर्णधार विराटला वाचण्यासाठी निवडलं जेव्हा की 1.2 कोटी वाचकांनी ऋषभ पंतला निवडलं. याशिवाय क्रिस गेलला 55 लाख, रशीद खानला 54 लाख आणि केन विल्यमसन यांना 48 लाख लोकांनी निवडलं. हे पाच क्रिकेटपटू वाचकांचे प्रमुख 5 आवडी आहे. 
 
यादीत 45 लाख वाचकांची आवड असलेले दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स, 23 लाखांसह न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाई 5 लाख, भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमरा 85 हजार आणि 5 हजार वाचकांच्या निवडीसह सिद्धार्थ कौल हे सामिल आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या पंत पासून विराट आठ पट पुढे आहे. 
 
वाचकांद्वारे सांगितलेल्या अधिकाधिक वेळेबद्दल बोलू तर या यादीत युवा खेळाडू पंत हा बराच पुढे आहे. डेटा नुसार पंत वाचकांद्वारे सतत वर्षभर वाचला गेला आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुमारे 600,000 हिट्ससह या डेटामध्ये वाढ झाली आहे.