सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (09:09 IST)

ऋषभ पंतची निवडणूक आयोगानं ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती

दिल्लीतल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऋषभ पंतची निवडणूक आयोगानं ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. ऋषभ पंतसोबतच टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राचीही ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये हे दोन्ही खेळाडू मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतील. ही माहिती दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी दिली आहे.
 
ऋषभ पंत आणि मनिका बत्रा रेडियो आणि व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाबाबत जागरुक करतील. मतदार मतदान केंद्रापर्यंत मोठ्या प्रमाणात यावेत, यासाठी निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललं आहे