आयपीएल : हैदराबाद प्ले ऑफमध्ये दाखल

Kane Williamson
Last Modified शुक्रवार, 11 मे 2018 (08:37 IST)

यजमान दिल्लीचा ९ विकेट्सने दणदणीत पराभव करत हैदराबादने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आयपीएलच्या ११ सत्रात प्ले ऑफमध्ये दाखल होणारा हैदराबाद पहिला संघ ठरला आहे.

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १८८ धावांचे आव्हान हैदराबादने सहज गाठले. कर्णधार विलियम्सन आणि सलामीवीर शिखर धवनने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. धवनने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारसह नाबाद ९२ धावा केल्या, तर कर्णधार विलियम्सने ५३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारसह नाबाद ८३ धावा केल्या.


त्याआधी युवा फलंदाज ऋषभ पंतने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने सनरायझर्स हैदराबाद समोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतने शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने ६३ चेंडूत नाबाद १२८ धावा केल्या. आयपीएलच्या या सीझनमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि जेसन रॉय झटपट परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही पंतशी योग्य समन्वय न साधल्याने ३ धावांवर रन आऊट झाला. पंतने त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. त्याने ५६ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह शतक झळकावले. पंतने ग्लेन मॅक्सवेल सोबत पाचव्या विकेट्ससाठी ६३ धावांची भागिदारी केली. भुवनेश्वरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आधी दोन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार खेचत त्याने २६ धावा केल्या.
आयपीएलच्या या सीझनमधील हे तिसरे शतक आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात टायटन्सचा पराभव ...

RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुजरात टायटन्सचा पराभव करून टॉप-4 मध्ये पोहोचले
चा 67वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला ...

IPL 2022: रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल ...

IPL 2022: रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होईल, बॉलीवूड सेलिब्रिटी सामन्यापूर्वी ग्लॅमर वाढवतील
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा अंतिम सामना IST रात्री 8 वाजता सुरू होईल. क्रिकबझच्या ...

महिला नाशिक प्रिमियर लीग स्पर्धेचा थरार उद्यापासून

महिला नाशिक प्रिमियर लीग स्पर्धेचा थरार उद्यापासून
महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी. श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी ...

KKR VS LSG 2022: लखनौने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा 2 ...

KKR VS LSG 2022: लखनौने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा 2 धावांनी पराभव केला
KKR vs LSG ipl 2022- लखनौने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा 2 धावांनी पराभव केलाDY पाटील ...

Women's T20 Challenge: स्मृती मंधाना , हरमनप्रीत आणि दीप्ती ...

Women's T20 Challenge: स्मृती मंधाना , हरमनप्रीत आणि दीप्ती महिला टी-20 चॅलेंजमध्ये कर्णधार , 23 मेपासून पुण्यात या स्पर्धेला सुरुवात होणार
भारतीय स्टार खेळाडू स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांची सोमवारी पुण्यात ...