मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (09:06 IST)

आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनलची वेळ बदली

IPL 2018

आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनलची वेळ बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आता हे सामने रात्री आठ ऐवजी संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत. आयपीएल संचालक राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.

क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ‘सामने उशीरापर्यंत होत असल्याने स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांना घरी जाताना त्रास होतो. तसेच टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांमनाही यामुळे रात्री उशीरापर्यंत जागावे लागते. सामना एक तास लवकर सुरु झाला तर दुसऱ्या दिवशी कार्यालयं तसेच शाळा कॉलेजात जाण्यासाठी त्यांना उशीर होणार नाही’ असे शुक्लांनी स्पष्ट केले.

आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना २२ मे रोजी मुंबईत होणार आहे. तर कोलकात्यातील इडन गार्डनवर २३ मे ला एलिमिनेटर आणि २५ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. फायनल लढत २७ मे रोजी पुन्हा मुंबई होणार आहे.