गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (07:41 IST)

कर्णधार ईश्‍वरी सावकारसह शाल्मली क्षत्रीय हिची महाराष्ट्राच्या संघात निवड

bcci
नाशिक  : बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येत असलेल्या 19 वर्षाआतील महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकची ईश्‍वरी सावकार आणि शाल्मली क्षत्रीय यांची निवड करण्यात आली.
टी-20 सामन्यात चमक दाखविणारी ईश्‍वरी सावकार ही महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करीत आहे. तिच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राच्या संघाने विजयी सलामी दिली. अरूणाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने सहा गडी राखून विजय मिळविला.
 
ईश्‍वरी सावकार आणि शाल्मली क्षत्रीय यांच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष धनपाल शाह, सचिव समीर रकटे व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.