बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:10 IST)

टीम इंडियाने सामन्यासह मालिका जिंकली

टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग सातवा मालिका विजय ठरला.

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग केला. पण जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याने न्यूझीलंडला 50 षटकांत सात बाद 331 धावांत रोखलं.

भारताकडून जसप्रीत बुमराने 47 धावांत 3, तर यजुवेंद्र चहलने 47 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान संपूर्ण मालिकेत शानदार फॉर्मात असणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात जरा महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात एक विकेट घेत 92 धावा दिल्या.