मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:22 IST)

आयसीसी वन डे रँकिंगमध्ये टीम इंडिया अव्वल

कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूरच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी पराभव करत  पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. या विजयासोबतच टीम इंडिया आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झाली आहे. 2014 नंतर टीम इंडियाने आपली जागा पुन्हा मिळवली. अगोदरपासूनच कसोटीत अव्वल असणाऱ्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं.

आयसीसी वन डे रँकिंगमध्ये आता भारत 120 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका (119), ऑस्ट्रेलिया (114), इंग्लंड (113) आणि न्यूझीलंड 111 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.