गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (16:40 IST)

टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आयसीसीने जाहीर केले

The ICC announced India and Pakistan in the same group in the T20 World Cup Cricket News In Marathi webdunia marathi
आयसीसी टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना गटात रंगणार आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सुपर 12 च्या गट -2 मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकत्र ठेवले आहे. सुपर 12 मध्ये दोन गट आहेत, ज्यामध्ये सहा संघ ठेवण्यात आले आहेत. गट -2 मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट-ए उपविजेता, गट-बी चँपियन संघ असेल तर गट -1 मध्ये इंग्लंड,ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, गट-ए उपविजेता असणार.गट बी विजयी संघ असेल. गट अ मध्ये श्रीलंका,आयर्लंड, नीदरलँड्स आणि नामीबिया संघ आहे, तर ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पपुना न्यू गिनी आणि ओमान आहेत.
 
 
यावेळी श्रीलंका,बांगलादेश सारख्या संघांनाही टी -20 विश्वचषकात थेट पात्रता मिळवता आले नाही. सुपर -12 साठी पात्र होण्यासाठी श्रीलंका आणि बांगलादेशला आपापल्या गटात विजेते किंवा उपविजेतेपदावर रहावे लागेल. 20 मार्च 2021 च्या रँकिंगच्या आधारे या गटाची निवड झाली आहे. टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि ओमान येथे खेळला जाणार आहे. पूर्वी हे टी -20 विश्वचषक भारतात खेळले जाणार होते, परंतु कोविड -19 साथीच्या रोगामुळे तो युएईमध्ये करवावे   लागले.या स्पर्धेचे होस्टिंग करण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) असेल.
 
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “टी -20 विश्वचषक स्पर्धेचे काऊंटडाऊन गटाच्या घोषणेनंतर सुरु झाले आहे. दोन्ही गटांचे सामने खूप रंजक असतील. मी यापूर्वी असे म्हटले आहे की टी -20 हे फॉर्मेट आश्चर्यकारकतेने भरलेले आहे आणि आम्ही त्यासाठी प्रतीक्षा केली पाहिजे. मला खात्री आहे की आम्हाला काही अतिशय रोमांचक सामने पाहायला मिळतील. 
 
तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करून ओमानला विश्व क्रिकेटमध्ये आणणे चांगले झाले.यामुळे युवा क्रिकेटपटूंना खेळामध्ये रस घेण्यात मदत होईल.