सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पोचेफेस्ट्रॉम , बुधवार, 29 जानेवारी 2020 (12:11 IST)

अंडर -19 विश्वचषक : भारत उपान्त्य फेरीत

वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने दिलेले 234 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला पेलवले नाही. 
 
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या आव्हानातील हवाच निघून गेली. ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 159 धावांत गारद झाला. भारताचा जलदगतीचा गोलंदाज कार्तिक त्यागी हा सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने 24 धावांत 4 बळी टिपले. 
 
उपान्त्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताच्या डावाची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. सलामीचा फलंदाज दिव्यांश सक्सेना 14 धावांवर तंबूत परतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 35 होती. त्यानंतर ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने एका बाजूने किल्ला लढवण्यचा प्रयत्न केला. त्याने सर्वाधिक 62 धावांची खेळी साकारली. जयस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडियासंकटात असताना सिद्धेश वीर आणि अथर्व अंकोलेकर यांनी डावाची धुरा हाती घेतली. सिद्धेश 25 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रवी बिष्णोईने 30 धावांची खेळी साकारत अथर्वला चांगली साथ दिली. अथर्वने 54 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 233 पर्यंत पोहोचवली.