1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Women's IPL to be postponed: BCCI

महिलांची आयपीएल लांबणीवर पडणार : बीसीसीआय

भारतात कोरोना रूग्णांची वाढत असलेली परिस्थिती पाहाता अनेक देशांनी भारतात प्रवासाला निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तीन संघांमध्ये होणारी महिलांची आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. ही स्पर्धा पुरूषांच्या आयपीएल स्पर्धे दरम्यानच होत असते. 
 
भारतातील कोरोना वाढल्यामुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व वेस्ट इंडीजच महिला क्रिकेटपटू येऊ शकणार नाहीत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, सध्याच्या घडीला कोणताही परदेशी खेळाडू भारतात येण्यास इच्छुक नाही. आम्ही नंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर या स्पर्धेचे आोजन करू. 
 
पुढील लेख
मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, पंकजा ताईंसाठी धनंजय मुंडेंचं भावनिक ट्वीट