शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

नगरचा ब्रँड अॅम्बेसिडर झहीर खान!

नगर- पाचशे वर्षाचा ऐतिहासिक ठेवा आणि उच्च सांस्कृतिक परंपरांचा वारसा जतन करणार्‍या नगर शहराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून त्याचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नाव पोहोचवण्यासाठी भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान यांनी ब्रँड अॅम्बेसिडर झाल्यास त्याचा शहराला व जिल्ह्याला मोठा उपयोग होईल.
 
श्रीरामपूर सारख्या छोट्या शहरातून पुढे आलेल्या झहीर खानने आपल्यातील क्रीडा कौशल्याची चमक दाखवत थेट भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविला व आज आपल्या देशाचा जलदगती गोलंदाज म्हणून नाव कमाविले.