शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By महेश जोशी|
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2009 (20:15 IST)

आफ्रिकेचा न्यूझीलंडवर सहज विजय

अब्राहम डीविलियर्सने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पाच गडी आणि नऊ षटके राखत सहज पराभव केला. या विजयामुळे उपात्यंफेरीत पोहचण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा जिवंत आहेत.

आफ्रिकेची सुरवात चांगली झाली नाही. 215 धावांच्या आव्हानास समोरे जाताना कर्णधार ग्रॅमी स्मिथ आठ धावांवर बाद झाला. त्यानंतर हाशिम आमला आणि जॅक कॅलिस यांनी पडझड होवू न देता एकेरी दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. संघाची धावसंख्या 74 झाली असताना जॅक कॅलिसला (37) बाद बॉंडने बाद करुन न्यूझीलंडला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर आमलाही 38 धावांवर बाद झाला. अब्राहमने जेपी ड्यूमिनी आणि मार्क बाऊचरच्या मदतीने आफ्रिकेची धावसंख्या वाढवत अपले अर्धशतकही फलकावर लावले. अब्राहम 70 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने 215 धावांचे लक्ष्य 41 षटाकात पूर्ण केले.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मिथचा निर्णय हा गोलंदाजांनी योग्य ठरविला. न्यूझीलंडचा पारनेलने न्यूझीलंडचा जेसी रायडरला आठ धावांवर बाद करुन पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मार्टिन गुप्टील 21 धावांवर बाद झाला. मॅकलम 44 धावांवर बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि एलिओट यांनी 71 धावांची भागेदारी केली. ही जोडी जमणार असे वाटत असताना एलिओट बाद झाला. त्यानंतर रॉस टेलर एकाकी लढत राहिला. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. तो 72 धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 47.5 षटकात 214 धावांवर आटोपला.

आफ्रिकेकडून पारनेलने 57 धावा देत पाच बळी घेतले. डेल स्टेन आणि रॉयलॉफ मेर्वे यांनी दोन, दोन जणांना बाद केले. बोयाने एक बळी घेतला.

धावफलकासाठी येथे क्लिक करा