गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (11:42 IST)

आयसीसीने खोलवर चौकशी करावी : सचिन

'न्यूज ऑफ द वर्ल्ड' या ब्रिटनमधील टॅबोलाईड वृत्तपत्राने स्टिंग ऑपरेशन करून कर्णधार सलमान बटसह पाकच्या ७ खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघडकीस आणले होते. या प्रकणामुळे क्रिकेटविश्वात प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणात आयसीसीने कठोर पावले उचलत आज बट, मोहम्मद आसिफ व मोहम्मद आमेर या 3 खेळाडूंना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

पाक क्रिकेटपटूंवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल असे नमूद करून सचिन म्हणाला, ''पाक खेळाडूंवर लावण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. इंग्लंडमध्ये जे काही घडले त्याची आयसीसीने खोलवर चौकशी करावी. इंग्लंडमधील घटनेवर येथे बसून प्रतिक्रिया द्यायला मी काही तज्ज्ञ नाही. मात्र, ही घटना क्रिकेटसाठी निराशाजनक आहे.''