deepawali
✕

मुंबईत पुस्तक दान सोहळा आयोजित

Updated: सोमवार, 30 एप्रिल 2018 (15:40 IST)
 
यावेळी डॉ. रावल यांनी पुस्तक प्रदर्शनात फेरफटका मारत वेगवेगळ्या पुस्तकांबाबत माहिती घेतली. त्यांच्यासोबत रत्ननिधी ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता, अलिबाबा डॉट कॉम - स्ट्रॅटेजिक पार्टनरचे वरीष्ठ उपाध्यक्ष विनय भारतीय, रत्न निधी ट्रस्टच्या संस्थापिका आशा मेहता आणि आयआयटी मुंबईचे प्रा. बी. रवी यांनीही यावेळी प्रदर्शनाची माहिती घेतली.
 
वाचन हा आपल्या मेंदूसाठी एक व्यायामच आहे. आपल्या देशातील अनेक हुशार आणि चौकस मुलं व तरुणांसाठी हव्या त्या प्रमाणात चांगल्या दर्जाचं वाचनीय साहित्य उपलब्ध नाही ही वाईट गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही मिशन मिलियन बुक्स ही संकल्पना राबवत आहोत. देशातील तरुण मुलांना चांगल्या दर्जाचं वाचनीय साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अगदी कमी कालावधीत आम्ही ७ लाखांपेक्षा अधिक पुस्तक जमा केली आणि भारतातील २००० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्याथ्र्यांना २.५ दशलक्ष पुस्तक देण्यात आली, असे मत अलिबाबा डॉट कॉम - स्ट्रॅटेजिक पार्टनरचे वरीष्ठ उपाध्यक्ष विनय भारतीय यांनी व्यक्त केले. 
 
आम्हाला दिवसाला साधारण ५००-१००० इतकी पुस्तक प्राप्त होत आहेत. या वेगाने २०१८ या संपूर्ण वर्षात आम्ही लाखो पुस्तकांची सीमा गाठू. आमच्या सर्व भागीदाराचे आम्ही आभारी आहोत. या चौथ्या वर्षातील उपक्रमात पुस्तकांसाठी बॅग पुरवणं आणि पुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च पेलणं आम्हाला शक्य झालं, याचा आम्हाला आनंद होत आहे. असे मत यावेळी रत्ननिधी ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता यांनी व्यक्त केले. 
 
या कार्यक्रमाला १००० पेक्षा अधिक शाळा मुख्याध्यापक उपस्थित होते. पुस्तक घेताना या मुख्याध्यापकांच्या चेहर्‍यावर अवर्णनीय आनंद व्यक्त होत आहे, अशी सुखद टिपण्णी आयआयटी - मुंबईचे प्राध्यापक बी. राव यांनी केली. 
 
फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र), जीवशास्त्र, गणित, विज्ञान, कम्प्युटर, भूगोल, इतिहास, शब्दकोष, एनसायक्लोपिडीया, कथा - कादंबरी, बिझनेस (व्यवसाय), व्यवस्थापन, गोष्टींची पुस्तकं, मानवता आणि धर्म, पौराणिक या विषयांवरील पुस्तकं, बालसाहित्य, मासिकं   अशी विविध प्रकारची पुस्तक या दान सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. 
 
गुगल डॉट ओआरजी ग्रांटी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टबाबत
 
रत्नानिधी ट्रस्टचे संस्थापक महेंद्र मेहता आणि गुजरातचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतानाचे २००९ मधील संग्रहित छायाचित्र. दिव्यांगांकरीताच्या प्रâी मोबेलिटी वॅâम्पसाठी गुजरातचे हे मुख्यमंत्री जास्तीत जास्त प्रयत्नशील राहिले. दिवंगत प्रिन्सेस डायना ट्रस्टद्वारे महेंद्र मेहता यांना मानाचा मानवतावादी रोझ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
रत्न निधी ही संस्था १९९० पासून कार्यरत आहे. त्यांचे हे काही उपक्रम. 
- ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य अलिबाबा या कंपनीसह रत्न निधी संस्था जगातील सगळ्यात मोठा मिशन मिलियन बुक्स हा पुस्तक दान उपक्रम राबवते.
- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, किरण बेदी, उदीत राज, रामदास आठवले आणि श्री रतन टाटा अशा मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कामाला पाठिंबा दिला आहे.
- रत्न निधी ही ऑर्थेटिक्स आणि प्रोथेटिक्स स्वरूपातील (अवयवदान, त्वचादान अशा स्वरूपातील दान) दान वा मदत उपलब्ध करून देणारी जगातील प्रमुख संस्था आहे. भारतात त्यांनी स्वतंत्ररित्या २.४८ लाखांपेक्षा अधिक संख्येत जयपूर फूट, पोलिओ क्लिीपर्स, व्हीलचेअर्स, पाळणा अशा स्वरूपाची मदत देऊ केली आहे.  
-  ही संस्था मागील १५ वर्षे मुंबईत रोज सकाळी माध्यान्ह भोजन पुरवते. या उपक्रमाद्वारे त्यांनी २३ दशलक्षापेक्षा अधिक भोजन पुरवले आहे. 
- मार्च २०१८ पर्यंत संस्थेने गरीब आणि गरजूंना १.१० दशलक्षापेक्षा अधिक कपडे पुरवले आहेत. 
- मार्च २०१६ मध्ये, दिव्यांगांना तंत्रज्ञानाद्वारे मदत उपलब्ध करून देणार्‍या उपक्रमातील अतुलनीय कार्याकरीताच्या पुरस्कारासाठी गुगलद्वारे रत्न निधी ट्रस्टची निवड करण्यात आली होती.  
अलिबाबा समूहाबाबत
व्यवसाय करणं कुठेही सहजसोपं व्हावं हाच अलिबाबा समूहाचा उद्देश आहे. ही ऑनलाइन आणि मोबाइल कॉमर्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. १९९९ मध्ये स्थापित झालेली ही कंपनी टेक्नोलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केटिंग सेवा पुरवते. याद्वारे अगणित ग्राहक आणि इतर व्यवसायांना ऑनलाइन सेवा दिली जाते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

अमेरिकेत फुटबॉल सामन्यापूर्वी १७० फूट उंचीवरून पडून अमेरिकी हवाई दलाच्या सैनिकाचा मृत्यू

रेल्वे स्थानकांवर आता चक्क मिळणार किराणा! मध्य रेल्वेने स्थानकांवर किराणा किऑस्क सुरू केले

पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या-"अजित दादा आपल्यात नाहीत; कोणताही उत्सव होणार नाही"

"स्त्रियांचा आदर हीच खरी भक्ती आहे" दुर्गापूजेनिमित्त राष्ट्रपतींनी दिला महत्वपूर्ण संदेश

पुढील लेख
Show comments