1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (08:41 IST)

पर्यावरण दिवस : पर्यावरणाचा सांभाळ हेच ध्येय मनी जपावं!

Environment Day
हिरवीगार धरित्री, खळबळ नद्या वाहतात,
पर्वतराजी सभोवताली निष्ठेनं उभ्या दिसतात,
ऊन वारा पाऊस, समतोल राखितात, 
ऋतू ही सारे आपले महत्व पटवितात,
एकमेकांना धरून च पर्यावरण चांगलं होतं,
हात मदतीचा द्यावा म्हणजे, देईल तो सोबत !
नानाविध औषधी वनस्पती जंगलात मिळते,
वन्य प्राण्यांनी सारे जंगल,सुशोभित होते,
रक्षण करण्या आम्ही सदैव सज्ज
असावं,
पर्यावरणाचा सांभाळ हेच ध्येय मनी जपावं! 
...अश्विनी थत्ते