बालिका दिन महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिवस (Balika Diwas) साजरा केला जातो. हा दिवस महिला शिक्षण दिन (Mahila Shikshan Din) म्हणून देखील साजरा केला जातो. आज 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती असल्याने आजच्या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा दिवस 1955 पासून 'बालिका दिन' म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. आता स्त्रिया केवळ 'चूल आणि मूल' इतक्याच चौकटीमध्ये अडकून न राहता बाहेर पडून काम करू लागल्याने त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी बालिका दिनाचं विशेष महत्त्व आहे.
महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचं, त्यागाचं स्मरण म्हणून हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले.