शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (14:22 IST)

वर्षानुवर्षे लटकून राहिलेल्या गोल्डन रॉकचे रहस्य आजही कायम

जगात अशा अनेक जागा, ठिकाणे आहेत ज्या मागचे रहस्य दीर्घ काळ संशोधन करूनही उलगडले गेलेले नाही. म्यानारमध्ये 25 फूट   शिलाखान्दाच्या एका टोकावर लटकून राहिलेला एक प्रचंड खडक त्यातील एक नमुना आहे. सोन्यासारख्या दिसणार्‍या या शिळेला गोल्डन रॉक असेच नाव असून जगभरातील बौद्धधर्मियांचे ते पवित्र तीर्थस्थळ आहे.
 
या शिळेला क्येक्तियो म्हणजे गोल्डन रॉक असे म्हणतात. वर्षानुवर्षे ही शीला याच अवस्थेत असून वादळ वारे, पावसात ती तसूभरही हललेली नाही. कोणत्याही क्षणी कोसळेल असे तिच्याकडे पाहिले की नक्की वाटते. बौद्धधर्मीय या शिळेला भगवान मानतात आणि तिच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. विशेषतः मार्च ते नोव्हेंबर या काळात लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. या ठिकाणी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा विश्र्वास आहे.